चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

महाराष्ट्र वेदर न्यूज : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. प्रत्यक्षात राज्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात थंडीची तीव्रता वाढत आहे. नोव्हेंबर महिन्यापासूनच थंडी पडायला सुरुवात होते. मात्र, यंदा थंडीची तीव्रता अजून वाढलेली नाही.

 

डिसेंबरचा पहिला आठवडा सरत आहे, मात्र अपेक्षेप्रमाणे थंडी नसल्याने कडाक्याची थंडी कधी सुरू होणार, हा प्रश्न कायम आहे. सर्वत्र तीव्र हिवाळा वाट पाहत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असून, अवकाळी पाऊस पडत आहे.

 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र अद्यापही अवकाळी पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

हवामान खाते काय म्हणते?

 

हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यासह देशाच्या विविध भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

या हंगामातील हे तिसरे चक्रीवादळ आहे जे आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उद्या म्हणजेच 5 डिसेंबर 2023 रोजी या भागात धडकणार आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला थेट धोका नाही.

 

याचा राज्यावर फारसा विपरीत परिणाम होणार नाही, असे सांगण्यात आले. पण चक्रीवादळात भरपूर वाफ असते. त्यामुळे राज्यात हवामानात बदल होत आहे.

 

आता पुढील तीन ते चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मराठवाडा,( विदर्भ,) पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग पुन्हा एकदा प्रभावित होणार असून या संबंधित भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.

 

कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल?

 

IMD नुसार, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, (jalna) बीड, लातूर, (Latur) नांदेड, हिंगोली (hin goli) जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

 

तसेच विदर्भातील अमरावती,(amravati) नागपूर,(nagpur) वर्धा आणि वाशीम जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

 

त्यामुळे अवकाळी पावसाचा जोर अद्याप पूर्णपणे कमी झाला नसला तरी पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. बाधित भागातील शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची अपेक्षा असून शेतकऱ्यांना पिके आणि त्यांच्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

batmyalive.com is a trusted source for mention the type of news or topics you cover, e.g., "breaking news, politics, technology, and more". Our mission is to deliver accurate, insightful, and timely news to our readers, empowering them to stay informed about the world around them

Leave a Comment