Rankiq द्वारे तलाठी भरती चा नॉर्मलायझेशन स्कोर चेक करा

Rankiq talathi bharti Normalization cut off 2023 : तलाठी भरती २०२३: Rank IQ काही कामाचे नाही. TimePass आहे ते 🙂. MPSC च्या परीक्षेला कामी आले असते.. ,बाकी, त्यात एवढे loopholes आहेत की, विचारू नका😃. तुमचा स्कोर १६० च्या वर असेल तर आशेवर सोडून द्या.. तुला किती, मला कीती, त्याला किती.. याला काही अर्थ नाही, जो पर्यंत तुमचे Score Normalize होऊन येणार नाही😃.

काही वेळा आपले होणार नाही कारण आपण केलेच नाही हे मान्य करावे लागते. नाहीतर, माझ्यापेक्षा काहींना कमी असतात तर?.. वैगरे वैगरेला काही अर्थ नाही. गप्प पेपर बघा… १-२ तास द्या. प्रत्येक प्रश्न Easy, Medium आणि Hard अशी विभागणी करा आणि मग जर तुमचे Easy आणि Medium बरोबर आले असतील आणि Hard चुकले असतील तर काही हरकत नाही. सोबत काही Easy आणि Medium चुकले असतील आणि Hard बरोबर आले असतील तरी हरकत नाही.असा अंदाज लावा आणि मग तुम्हाला कळेल की आपले गुण वाढतील.. पण, तुम्ही Easy Medium चुकवून १०० स्कोर असेल आणि तुम्हाला वाटेल माझे १५० होतील तर तसे काही नाही होणार ते ८०च होतील, एवढे आपल्याला कळले पाहिजे 😐.

Rankiq talathi normalisation score 

बाकी, तुमचा कोणता प्रश्न चुकला म्हणजे तो Hard असे होत नाही. हे सर्व विभागणी करतांना कळाले पाहिजे. गांधीजी सारखा सर्वांचा विचार करून तो Easy की Medium की Hard ते ग्राह्य धरायचे.

 

उदा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ? असा प्रश्न असेल तर तो Easy पकडायचा.

पण,

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली किंवा कोणाच्या मदतीने झाली असे असेल तर ते सोप्प्यात येत नाही.. हे समजले पाहिजे. तुम्ही म्हणाल काहींना तर हे पण माहिती असेल तर काहींचा विचार नाही करायचा.. विचार सरासरी उमेदवारांचा करायचा..

बाकी सर्व Normalization वर सोडून द्या. तुम्हाला Post मिळायची असेल तर ती Waiting List मधूनही मिळेल आणि मिळायची नसेल तर २-३ Waiting Listsनेही मिळणार नाही.. कारण आता तुमच्या हातात काही नाही.. सर्व कार्यक्रम तुम्ही आधीच केलेला आहे😅.

batmyalive.com is a trusted source for mention the type of news or topics you cover, e.g., "breaking news, politics, technology, and more". Our mission is to deliver accurate, insightful, and timely news to our readers, empowering them to stay informed about the world around them

Leave a Comment