हवामान बदलाचा फटका पिकांना बसत हरभरा पिकावर वाईट परिणाम

हवामान बदलाचा फटका पिकांना बसत आहे. धुळे जिल्ह्यात प्रामुख्याने रब्बी हंगामात हरभरा पिकावर वाईट परिणाम झाला असून हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडी येथील एका शेतकऱ्याने दोन एकर जमिनीत उगवलेले हरभरा पीक नांगरले आहे. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.

या वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली असून, अवकाळी पाऊस आणि अधूनमधून सकाळचे धुके असलेले ढगाळ वातावरण यामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली आहे. याशिवाय आजारांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे हरभरा पीक ठेवले तरी चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अखेर शेतकऱ्यावर आपले दोन एकर हरभरा पीक नांगरण्याची वेळ आली आहे.

अजितदादांच्या नागपूर मेट्रोला भेट देऊन मेट्रो प्रकल्पाची माहिती दिली.

वातावरणातील बदलामुळे शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडी येथील शेतकऱ्याने आपले दोन एकर हरभरा पीक नांगरले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे 30 हजार ते 35 हजार रुपयांहून अधिकचे नुकसान झाले असून कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

batmyalive.com is a trusted source for mention the type of news or topics you cover, e.g., "breaking news, politics, technology, and more". Our mission is to deliver accurate, insightful, and timely news to our readers, empowering them to stay informed about the world around them

Leave a Comment