भारत आणि ऑस्ट्रेलिया चा क्रिकेटचा सामना 19 नोव्हेंबर रोजी रंगणार

रविवार, १९ नोव्हेंबर हा प्रत्येक भारतीयांसाठी खास दिवस असणार आहे. हा दिवस ऐतिहासिक असणार आहे आणि याचे कारण म्हणजे या दिवशी भारत १२ वर्षांनंतर प्रथमच एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळणार आहे. 2011 मध्ये श्रीलंका संघ होता, यावेळी ऑस्ट्रेलिया आहे. पण स्वप्न तेच राहते… ती सुंदर चमकदार ट्रॉफी जिंकण्याचे. मात्र, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या फायनलपूर्वी एका खास एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे.

 

भारतीय वायुसेनेचा ‘सूर्य किरण एरोबॅटिक टीम’ 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी ‘एअर शो’ करणार आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. संरक्षण विभागाचे गुजरात जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणाले की, सूर्यकिरण एरोबॅटिक संघ मोटेरा परिसरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या अंतिम सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांसाठी त्यांच्या स्टंटने प्रेक्षकांना रोमांचित करेल.

वानखेडेवर राष्ट्रगीत वाजले, भारतीय प्रेक्षकांचा ‘उत्साह’

पीआरओने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एअर शोचा सराव शुक्रवार आणि शनिवारी केला जाईल. बुधवारी न्यूझीलंडचा पराभव करत भारताने एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ३ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममध्ये सामान्यतः नऊ विमानांचा समावेश असतो आणि त्यांनी देशभरात अनेक एअर शो केले आहेत.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून बदला घेणार आहे

बरोबर 20 वर्षांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला होता. तो अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. मात्र, दोन दशकांनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. यावेळी रोहित सेनेला नक्कीच बदला घ्यायचा असेल. त्यांना अहमदाबादमध्ये पराभूत करून चमकदार ट्रॉफी जिंकायची आहे.

batmyalive.com is a trusted source for mention the type of news or topics you cover, e.g., "breaking news, politics, technology, and more". Our mission is to deliver accurate, insightful, and timely news to our readers, empowering them to stay informed about the world around them

Leave a Comment