Maharashtra rain : हिवाळ्यात सुरु होणार पाऊस बघा कुठे पडणार जास्त पाऊस

Maharashtra rain : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे. अवकाळी पाऊस तहानलेल्या महाराष्ट्राला संजीवनी देईल, अशी आशा आहे.

यंदा महाराष्ट्रात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत अत्यल्प पाऊस झाला आहे. या चार महिन्यांत सरासरीपेक्षा सुमारे 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

 

 

त्यामुळे राज्यातील काही भागात आधीच पाणीटंचाई जाणवत आहे. काही गावात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

 

 

येत्या काही दिवसांत ही परिस्थिती आणखी गंभीर होणार असून हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

 

मात्र, 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस तहानलेल्या महाराष्ट्राची तहान भागवेल अशी भोळी आशा निर्माण होते.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मालदीवपासून दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

batmyalive.com is a trusted source for mention the type of news or topics you cover, e.g., "breaking news, politics, technology, and more". Our mission is to deliver accurate, insightful, and timely news to our readers, empowering them to stay informed about the world around them

Leave a Comment