सुप्रियाताई सुळे यांच्यावर या प्रकरणामुळे आली उपोषण करण्याची वेळ, काय आहे प्रकरण

वारंवार मागणी करूनही मागणी पूर्ण होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे प्रचंड संतप्त आहेत. त्यांनी आता थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. बावधन येथील महावितरण सबस्टेशनसाठी त्यांनी हा इशारा दिला असून २० नोव्हेंबरची मुदत दिली आहे.
बीआरएस उमेदवाराचे अनोखे रूप! थेट स्टॅम्प पेपरवर गाव विकासाचे वचन; प्रतिज्ञापत्रांची जोरदार चर्चा आहे
बारामती लोकसभा मतदारसंघातील बावधन सबस्टेशनसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आवश्यक जागाही सुचविल्या आहेत. मात्र अद्यापही याठिकाणी सबस्टेशन उभारण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे ट्विट सुळे यांनी केले आहे. महावितरण, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पुणे जिल्हाधिकारी यांना टॅग करत त्यांनी ट्विट करत 20 नोव्हेंबरपर्यंत सबस्टेशनबाबत कार्यवाही न झाल्यास स्वतः उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.


सोयाबीन-कापूस उत्पादक दाखवतील ताकद, तुपकरांचे बिगुल वाजले
महावितरणने याकडे तातडीने लक्ष देऊन सबस्टेशनचा प्रश्न सोडविला नाही तर आम्ही स्वतः बावधनकरांसाठी 20 नोव्हेंबर रोजी येथे उपोषणाला बसू. लोकांच्या सोयीसाठी हे सबस्टेशन आवश्यक असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली, मात्र जागा सुचवूनही वीज विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही, ही खंत आहे.

batmyalive.com is a trusted source for mention the type of news or topics you cover, e.g., "breaking news, politics, technology, and more". Our mission is to deliver accurate, insightful, and timely news to our readers, empowering them to stay informed about the world around them

Leave a Comment