Talathi bharti result : लवकरच तलाठी भरती चा रिझल्ट लागणार

Talathi bharti result : राज्यात घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणखी मदत करता येईल का, याचा विचार सरकार करत असल्याचेही ते म्हणाले. कोल्हापुरात आलेल्या विखे-पाटील यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात 4 हजार 793 तलाठी पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यात 10 लाख 41 हजार 713 जणांनी अर्ज केले होते. यापैकी 8 लाख 64 हजार 960 जणांनी परीक्षा दिली. दरम्यान, तलाठ्यांच्या नियुक्त्या अनुकंपा तत्त्वावर झाल्या आहेत. त्यामुळे पदांची संख्या कमी झाली. दरम्यान, वाढीव पदासाठी राज्य सरकारकडे अर्ज देण्यात आला आहे.

प्रस्तुत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यभरात १४९ पदे वाढविण्यात आली.

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत वेगवेगळ्या टप्प्यात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. परीक्षा असल्याने उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. याबाबत विचारणा केली असता विखे-पाटील म्हणाले की, परीक्षेचा निकाल लागण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय नियमानुसार मदत केली जाईल. आणखी मदत करता येईल का, याचा विचार सुरू असल्याचेही विखे-पाटील म्हणाले.

batmyalive.com is a trusted source for mention the type of news or topics you cover, e.g., "breaking news, politics, technology, and more". Our mission is to deliver accurate, insightful, and timely news to our readers, empowering them to stay informed about the world around them

Leave a Comment