नमो सन्माननिधी सहा हजाराचा दुसरा हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

नमो सन्मान निधी नमो शेतकरी 6000 चा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा, 100% पुराव्यासह यादी देखील पहा मुख्यमंत्री शेतकरी लाभार्थी यादी नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेतून शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्याकडून दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत.

 

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीत राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ केला. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे आता शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्याकडून दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका क्लिकवर राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून या योजनेचा शुभारंभ केला. दरम्यान, हा आपल्या आयुष्यातील ऐतिहासिक आणि अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. नमो सन्मान निधी

 

तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणात ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. 15 जुलै 2023 रोजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारला, त्यानंतर त्यांनी या योजनेला चालना दिली. काही किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 12 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित राहिले. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 6 लाख शेतकरी वाढले. आता या शेतकऱ्यांनाही नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.

batmyalive.com is a trusted source for mention the type of news or topics you cover, e.g., "breaking news, politics, technology, and more". Our mission is to deliver accurate, insightful, and timely news to our readers, empowering them to stay informed about the world around them

Leave a Comment