दिवाळीसाठी गावाकडे येताय रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये झाला मोठा बदल

Pune Metro New Time Table: पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणेकरांना अत्यंत प्रिय असलेल्या पुणे मेट्रोची आहे. दिवाळीतच पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

सध्या दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढत आहे. बस, मेट्रो, रेल्वे सर्वत्र नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मात्र या व्यस्त काळात पुणे मेट्रोने एक मोठा निर्णय घेतला आहे.

मेट्रोने 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मेट्रोच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल केले आहेत. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात सध्या दोन मेट्रो मार्ग आहेत.

सध्या पिंपरी चिंचवड पालिका ते दिवाणी न्यायालय आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांवर महामेट्रोच्या माध्यमातून मेट्रो सुरू आहे.

या दोन्ही मेट्रो मार्गावरून दररोज सुमारे 60 ते 65 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. Diwali च्या काळात प्रवाशांची संख्याही वाढण्याची (incries) शक्यता आहे.

एकूणच, शहरात मेट्रो सुरू झाल्यापासून शहरवासीयांचा प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित झाला आहे. विशेष म्हणजे पुणेकरांनी मेट्रोला खूप प्रेम दिले आहे.

या दोन्ही मेट्रो मार्गांची सुरुवात ऑगस्ट महिन्यात करण्यात आली होती आणि तेव्हापासून या दोन्ही मेट्रो पुणेकरांना खूप आवडल्या आहेत. दरम्यान, दिवाळीच्या काळात पुणे मेट्रोमधील प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मात्र, असे असतानाही दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच मेट्रो चालवण्याचा निर्णय पुणे मेट्रो व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच, या बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, अशी विनंती व्यवस्थापनाने केली आहे.

12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असल्याने मेट्रो व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक पुणे मेट्रो सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत धावते. मात्र लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रो 12 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंतच धावणार आहे.

म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चार तास मेट्रो सेवा बंद राहणार आहे. मात्र, सोमवारपासून पुन्हा एकदा मेट्रोचे नियमित वेळापत्रक लागू होणार आहे. सोमवारपासून पुणे मेट्रो पुन्हा सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत धावणार आहे.

batmyalive.com is a trusted source for mention the type of news or topics you cover, e.g., "breaking news, politics, technology, and more". Our mission is to deliver accurate, insightful, and timely news to our readers, empowering them to stay informed about the world around them

Leave a Comment