केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज ठाकरे यांनी करून दिली त्या वाक्याची आठवण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर टीका करताना ‘भाजपने टूर आणि ट्रॅव्हल्सचे नवे खाते उघडायला हवे होते.’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान भाजप सत्तेवर आल्यास राम मंदिराचे मोफत दर्शन देऊ, असे आश्वासन दिले होते. या विधानाची राज ठाकरेंनी दखल घेतली. पदवीधर निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

आगामी पदवीधर निवडणुकीच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी ठाण्यात आले होते. यावेळी ठाकरे यांनी मध्यवर्ती कार्यालयात मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे म्हणाले की, ज्या उमेदवारासाठी पदवीधरांनी येऊन मतदान करावे, तो पदवीधर असावा, अशी कोणतीही अट नाही.

सिनेट निवडणुकीसाठी आम्ही अर्ज भरत आहोत, पुढील वर्षी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत बैठक झाली, असेही ठाकरे म्हणाले. मराठी पाट्यांबाबत न्यायालयाने आदेश दिले, तरीही त्याचे पालन होत नाही, सरकारही या प्रश्नावर काहीच करत नसल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. सण कसा साजरा करायचा, फटाके कधी फोडायचे हे न्यायालय ठरवते, मात्र त्याचे पालन होते की नाही, याकडे कुणीच लक्ष देत नसल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात अनेकांना जात प्रिय आहे, प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान आहे,

मात्र, आमच्या पक्षात जातीवादाला थारा नाही, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून जातीजातींमध्ये तेढ निर्माण झाली आहे.

१९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हापासून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण झाली आहे. हे सर्व आपल्या स्वार्थासाठी केले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. याशिवाय सत्तेचा अमर पट्टा घेऊन कोणी येत नाही, वाजपेयींचा काळ वेगळा होता. तेव्हाची पद्धतही वेगळी होती, ईडीचे छापे वगैरे फार काळ टिकणार नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

batmyalive.com is a trusted source for mention the type of news or topics you cover, e.g., "breaking news, politics, technology, and more". Our mission is to deliver accurate, insightful, and timely news to our readers, empowering them to stay informed about the world around them

Leave a Comment