भारतीय संघाने विश्वचषकात विश्वविक्रम केला आहे.  कारण भारताला वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही

या सामन्यात रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी दमदार अर्धशतके झळकावली मात्र कोणालाही शतक झळकावता आले नाही. 

या सामन्यात भारताच्या पहिल्या चारही खेळाडूंनी अर्धशतकं ठोकून विश्वविक्रम केला.  हा पराक्रम आजपर्यंत कोणालाही करता आलेला नाही.

श्रेयस आणि लोकेश राहुलच्या शतकांच्या जोरावर भारताने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 410 धावांचा डोंगर उभा केला.

या सामन्यात श्रेयस अय्यरने 94 चेंडूत नाबाद 128 धावा केल्या, यावेळी राहुलने 98 चेंडूत 102 धावा करत त्याला साथ दिली.

भारताची सुरुवात चांगली झाली होती.  गिलने 32 चेंडूत 51 धावा केल्या.  कर्णधार रोहितने 54 चेंडूत 61 धावा केल्या.  एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे.